सूचना

नमस्कार BLOG DEVELOPING चे काम चालू आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल...............................................

सुस्वागतम

मा.सुशिलकुमारजी खोडवेकर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद परभणी यांच्या प्रेरणेने शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभाणी मार्फत सुरु करण्यात आलेल्या प्रज्ञांकूर ई मासिक या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

विषय :- ५ वा अंक आनंददायी शाळा" या विषयावर प्रकाशित होणार, तात्काळ लेख पाठवा

NEW POST प्रज्ञांकुर प्रकाशन सोहळा* �������������� *प्रज्ञांकुर* या E-newsletter च्या पाचव्या अंकाचे प्रकाशन उद्या *दिनांक ३१ डिसेंबर* रोजी , प्रज्ञांकुर ची मुळ संकल्पना व प्रेरणा स्थान असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे *मुख्यकार्यकारी अधिकारी मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांच्या हस्ते त्यांच्या *वाढदिवसाचे* औचित्य साधून करण्यात येणार आहे . सदरील प्रकाशन सोहळ्यास *सर्व अधिकारी , प्रज्ञांकुर ग्रुप सदस्य व कर्मचारी वृदांनी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व सदरील अंक भेट* देण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे . *प्रमुख उपस्थिती* : १) *मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* मुख्यकार्यकारी अधिकारी ,जि.प.परभणी २) *सौ. मृण्मयी खोडवेकर.* *कार्यक्रमाचे स्वरूप* : प्रज्ञांकुर E-newsletter चे प्रकाशन , साहेबांना *वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व प्रज्ञांकुर अंक भेट देणे .* *स्थळ:* जिल्हा परिषद सभागृह, परभणी . *वेळ :* दुपारी ३:३० वाजता . *विनित :* "प्रज्ञांकुर" ��-newsletter, संसाधन कक्ष, जि.प. परभणी . ������������������

Saturday, 15 October 2016


*गौरव शिक्षकांचा*    
 *प्रस्तावना:*
 ✍🏾*आज परभणी जिल्हा परिषद आयोजित जिल्हा - स्तरीय आर्दश शिक्षकांचा गौरव सोहळा नृसिंह पोखर्णी येथे पार पडला.गौरव करण्यासाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारर्दशक पद्धतीने राबवण्यात आली .यामुळेच या गौरव सोहळयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि गौरवास प्राञ असलेली शिक्षकवृंद निवडले गेले यांचा  मनोमन आनंद वाटला.आणि शिक्षणा सारख्या पविञ क्षेत्रात मागच्या काही काळात जो पुरस्कार निवडीमध्ये बाजार भरला होता.तो मागील वर्षापासुन झालेल्या विशिष्ट निवड प्रक्रियेचा परिणाम हा झाला कि ,गुणवत्ताधारक ,गुणवान अष्टपैलु व्यक्तीमत्वची निवड या गौरवासाठी  पाञ ठरले.
🕯🕯दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले🕯🕯

*आज सोहळ्या साठी उपस्तीत  सर्व मान्यवरांचा सत्कार शिक्षण विभाग यांच्या कडून करण्यात आला*
*प्रास्तविक*:-
शिक्षणाधिकारी श्रीमतीआशा गरुड मॅडम यांनी केले.
*मनोगत*:-
   श्री शिक्षक प्रतिनिधी
  श्री भोसले सर
  श्री महेश पाटील
  श्री  दादासाहेब टेंगसे
  श्री खोडवेकर साहेब
  श्री राजेश दादा विटेकर साहेब
 मुख्यतः
*दादासाहेब टेंगसे*:
         सभापती पदावर आल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी किती पारदर्शक कामे केले याबाबत सहज स्पष्टीकरण केले ,500 शाळणाभेटी,611 शाळा ई लर्निंग केल्या व खरोखर त्यांनी परभणी जिल्हा साठी खूप आदर्श असे काम केले.
*मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशील खोडवेकर साहेबांनी*       बोलताना स्पष्ट केले कि,या पारदर्शक प्रक्रियेत माझ्या इतकाच सभापती,अध्यक्ष यांचा वाटा आहे.ज्यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशील खोडवेकर सरांनी सभाग्रहात
*गुणवंत शिक्षक मिञ श्री.पिसाळ सरांना* उभे करुन त्याच्या ज्या मोजक्या मोकळ्या शब्दात त्याच्या कार्याचा गौरव केला ,त्याच वेळेस सभाग्रहातील सर्व उपस्थिताना कळाले कि,श्री.सुशील खोडवेकर साहेबांनी सुध्दा या निवड प्रक्रियेत फार पारर्दशक निवड केलेली आहे.साहेबांनी
*श्री.विठ्ठल भुसारे सरांच्या* कार्याचा गौरव करताना अतिशय नाविन्यपुर्ण काम शिक्षण क्षेत्रात करत आहेत ,हे वारंवार सांगितले .
*श्री.यरमाळ सर*
यांनी सुध्दा शिक्षण क्षेत्रात आधुनिकीकरण्यांचा उपयुक्त उपयोग करुन .खुप चांगले काम करत आहेता असे  गौरव उद्दगारांनी साहेबांनी त्यांच्या गौरव केला.अशाप्रकारे प्रशासनाकडुन पांठिबा मिळु लागल्यावर सर्वक्षेञ कार्य घडुन येते.त्याप्रमाणे
 *पुर्णा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळेत श्री.पिसाळ सरांनी*- विदयार्थीना टँब उपलब्धतेसाठी कशाप्रकारे कार्य केले हे एक उत्तम उदाहरण आहे असे सांगितले .प्रशासनाकडुन अशाप्रकारे पारर्दशक शाब्बास कि ची थाप मिळालावर ,शिक्षकांना एक नवसंजिवनीच मिळाल्यासमान आहे.त्यांचेच फलित म्हणजे
*प्रज्ञा अंकुर*
 प्रज्ञा अंकुर 2 चे प्रकाशन केले व महाराष्ट्रातील पहिले आहे व विशेष असल्याचे सांगितले
 *स्वच्छ शाळा*
 स्वच्छ शाळा साठीचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने पालम ,पूर्णा, सोंपेठचे अभिनंदन केले
 *शिक्षण सभापती श्री.दादासाहेब टेंगसे साहेबांनी* सांगितले त्याप्रमाणे जिल्ह्यातील 50% शाळा ज्ञानरचनावादी,ई-लर्निं झालेल्या आहेत.त्याचप्रमाणे जि.प.शाळा गुणत्तेची एक धारदार कात टाकत आहेत.यासाठी
*जिल्हा परिषद अध्यक्ष  श्री.राजेश दादा विटेकर साहेब* यांनी या सामाजिक क्रांतीच्या शैक्षणिक चळवळीला पालकमंञाकडु 1कोटीची आर्थिक मदत खेचुन आणली आणी त्यातुन आपण काही निवडक शाळांना ज्ञानरचनावाद ,ई-लर्निंग साठी अनुदान दिले.त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थितीत जि.प.शाळासाठी फार मोठा लोकसहभागातुन आर्थिक मदत उभी राहिलेली आहे.यातुन जि.प.शाळाचे एक नवे आधुनिककाळातील ई-लर्निंग ,ज्ञानरचनावादी सर्व समृद्ध शैक्षणिक रुप निर्माण झालेले आहे.यातुनच समाजात शैक्षणिक क्रांती घडेल ,असे सांगुन  अध्यक्ष राजेदादा विटेकर यांनी समारोप केला .

✍🏾प्रांजळपणे शिक्षकांचे कौतुक  करणारे खोडवेकर साहेब सर्वांनाच आवडले
✍🏾शिफारस केली पण नावा प्रमाणे खोडवेकरांनी खोडली पण मला आनंदच वाटला कारण ते योगे नाही असे प्रामाणिकपणे काबुल करणारे राजेश दादा सर्वांना अगदी मनापासून आवडले
*वितरण*

नवोदय पात्र विध्यार्थी सत्कार
SSc टॉपर विध्यार्थी सत्कार
जमीन दानदेणारे नागरिक सत्कार

गुणवंत शिक्षक सत्कार सोहळा
 अशा रुपरेषेतून कार्यक्रम अतिशय आनंदात व उल्हासात पूर्णपणे यशस्वी झाला
      🙏शब्दांकन 🙏
       माधव नामदेव मुंढे
               प्रा प

No comments:

Post a Comment